स्त्रीवाद आणि सामाजिक व मानसिक विकास
आज मला माझ्या एका मैत्रिणीने स्त्री हक्कांबद्दल आणि राजकिय वर्तुळात महिला सहभागातून झालेल्या सामाजिक आणि मानसिक विकासावर आधारित एक रिल प्रसारमाध्यमांवर (Instagram) पाठवली होती. त्या Reel ने मला चिंतन मंथन करण्यास भाग पाडले त्यातून मी प्रोत्साहित होऊन आपले विचार तुमच्या समोर सादर करत आहे. माझ्या विचारांशी तुम्ही सुद्धा सहमत ( काही अपवाद वगळता) होणार किंवा मी टीकेचा पात्र होईल. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत पुरूषप्रधान समाजाने स्त्रीला समाजात दुय्यम दर्जा दिलेला आहे. आधुनिक काळात काही देशांनी स्त्रीयांना राजकिय क्षेत्रात भरघोस संधी दिल्याने त्या समाजात सामाजिक आणि मानसिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन आणि विकास झाल्याचे दिसून येत आहे. तुम्ही कधीकाळी किंवा सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्वच निर्देशांकात नॉर्डिक देश अव्वल स्थानावर दिसतील. त्या मागच्या कारणांचा शोध आपण कधीच घेत नाहीत. माझ्या विचारांतून हे प्रतिपादन करण्याचे आहे की वरील देशात सत्तेचे सुत्रे हे १९५० नंतर स्त्रीकडे गेलेले आहेत किंवा या समाजात स्त्रीयांना पुरूष इतकी ...








