स्त्रीवाद आणि सामाजिक व मानसिक विकास
आज मला माझ्या एका मैत्रिणीने स्त्री हक्कांबद्दल आणि राजकिय वर्तुळात महिला सहभागातून झालेल्या सामाजिक आणि मानसिक विकासावर आधारित एक रिल प्रसारमाध्यमांवर (Instagram) पाठवली होती. त्या Reel ने मला चिंतन मंथन करण्यास भाग पाडले त्यातून मी प्रोत्साहित होऊन आपले विचार तुमच्या समोर सादर करत आहे. माझ्या विचारांशी तुम्ही सुद्धा सहमत ( काही अपवाद वगळता) होणार किंवा मी टीकेचा पात्र होईल.
प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत पुरूषप्रधान समाजाने स्त्रीला समाजात दुय्यम दर्जा दिलेला आहे. आधुनिक काळात काही देशांनी स्त्रीयांना राजकिय क्षेत्रात भरघोस संधी दिल्याने त्या समाजात सामाजिक आणि मानसिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन आणि विकास झाल्याचे दिसून येत आहे. तुम्ही कधीकाळी किंवा सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्वच निर्देशांकात नॉर्डिक देश अव्वल स्थानावर दिसतील. त्या मागच्या कारणांचा शोध आपण कधीच घेत नाहीत. माझ्या विचारांतून हे प्रतिपादन करण्याचे आहे की वरील देशात सत्तेचे सुत्रे हे १९५० नंतर स्त्रीकडे गेलेले आहेत किंवा या समाजात स्त्रीयांना पुरूष इतकी समानता प्राप्त झालेली आहे.
जगाची निम्मी लोकसंख्येचा भाग स्त्री (जवळपास ३५० कोटी) आहे, परंतु अद्यापही स्त्री जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जे स्थान मिळायला हवे होते अजूनही प्राप्त झालेले नाहीत. विकसनशील आणि अविकसित देशांत संवैधानिक मार्गाने हक्क दिलेले आहेत. प्रत्यक्षात आकलन गेल्यास आपल्या लक्षात येणार की परिस्थिती याहून उलट आहे. भारतात सुध्दा २०२३ मध्ये नवीन संसदेच्या पहिल्या बैठकीत नारी वंदन अधिनियम पास करण्यात आला. ज्यामध्ये स्त्रीयांना ३३% प्रतिनिधित्व देण्यात आले, पण प्रत्यक्षात त्याला २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांपासून लागू करण्यात यायला पाहिजे होते. पण परिस्थिती याहून उलट आहे. त्यांचे कारण म्हणजे पुरुष प्रधान समाजातील पितृसत्ताक पद्धती होय. सध्या सरकार परिसीमन आयोग गठन केल्यावर सीट वाढल्यानंतर लागू करेल त्यातून विद्यमान पुरूष प्रतिनिधींच्या जागांना धक्का लागणार नाही. पण नाॅर्डिक देशांची तुलनात्मक अध्ययन केल्यास हे लक्षात येणार की कोणत्याही राष्ट्रांचे विकास महिला सहभागाशिवाय अपूरे आहे.
नाॅर्डिक देशांत स्त्री सहभागाने सामाजिक अभियांत्रिकी प्रंचड प्रमाणात झालेली दिसून येते. या देशात सत्तेची सूत्रे स्त्रीकडे गेल्याने मानसिक, भावनिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी झालेली आहे. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास झपाट्याने झाले. स्त्री समानता, स्त्री सहभागिता, स्त्री आरोग्य, स्त्री हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व वाढलेले आहे. या देशात स्त्रीला स्त्री म्हणून वागणूक मिळालेली असल्याने धर्म या बाबींचा महत्त्व कमी झालेले आहे. या देशात तार्किकता आणि विवेकाला प्राधान्य देण्यात आले आहे. जेव्हा समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो तेव्हा समाजात सामाजिक व मानसिक उत्थान तितकाच तीव्रतेने वाढतो. नाॅर्डिक देशांत हे बदल आणि सुधारणा घडवून आणण्यात स्त्री शक्तीचे प्रंचड योगदान आहे. परंतु शोकांतिका हे आहे की स्त्री शक्तीचे खरे महत्त्व जगाने अजूनही ओळखले नाहीत.
संसाराच्या रथाचा गाडा चालण्यासाठी ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष अशा दोन रूपी चाकांची गरज असते. त्याचप्रमाणे देशातील सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी स्त्री आणि पुरुष समानतेच्या धाग्यांचे अनन्यसाधारण महत्वाचे असते. त्यामुळे जगाने नॉर्विड देशांकडून धडे घेणे आवश्यक आहे. विकसनशील आणि अविकसित देशांनी स्त्री संवैधानिक हक्कांना जमीन पातळीवर लागू करावे. हक्क आणि राजकीय सहभाग कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात बदल घडवून आणावे. स्त्री शक्तीला सर्वतोपरी संधी देण्यासाठी नागरी सरकारांनी प्रयत्न करावे. स्त्री ह्या जातीला उपभोगी वस्तू म्हणून न बघता सहभागी या नजरेतून बघणे तितकेच अगत्याचे आहे.
Comments
Post a Comment