निसर्ग, हिंदू धर्म आणि आधुनिकता
प्राचीन इतिहासापासून हिंदू धर्मातील सणातून निसर्गाची पूजा करत आहोत. होळी असो, वटपौर्णिमा असो यातून हे स्पष्ट होते प्राचीन काळापासून हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हिताची जोपासना करणारा आदर्श धर्म आहे. त्याचप्रमाणे सगळ्या लोकांमध्ये एकोपा करणे, बंधूंभाव वाढवणे, सहकार्याची भावना निर्माण करणे आणि एकमेकांशी आदरपूर्वक विचारांची देवाणघेवाण करणे हिंदू धर्मातील मध्यवर्ती वैशिष्ट्य आहे. पण आधुनिक काळात अनेक सुप्रसिद्ध विचारवंत आणि बौद्धिक समाज हिंदू धर्मातील सणातून होणाऱ्या परिणामांची उजागरणी करतात.
आधुनिक काळातील राजकीय राज्यघटना किंवा शिक्षण व्यवस्थेतून समाजातील नागरिकांना शास्त्रीय दृष्टीकोन तयार करण्यास भाग पाडतात ते समाज पोषक आहे, कारण मानवी वर्तनावर सकारात्मक परिणाम पडून तो भावनांच्या आहारी न जाता तथ्याच्या आधारे बौद्धिक मांडणी करतो. परंतु एका बाजूला हे विसरता कामा नये,की माणूस त्याच्या वंशागत पध्दतीने पार पाडत आलेल्या धर्मापासून अलिप्त होऊ शकत नाही. ते सुसंगता आपण हिंदू धर्म, आधुनिकता आणि निसर्ग यावर करू.
चंद्रपूर जिल्हा म्हटले की, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जंगल असलेल्या पहिल्या तीन यादीत क्रमांक पटकावतो, त्याचप्रमाणे माझे गाव सुद्धा जंगलाने वढलेले आहेत. माझ्या गावातील निवासी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीवर अवलंबून आहेत. पण ते सगळ्या गावाला बारमाही रोजगार देणारे साधन ठरत नाही. त्यामुळे १८ ते २८ वयातील अनेक तरूण शहराकडे अल्प कालावधीसाठी पलायन करतात. गावातील काही समाज कुक्कुटपालनातून उदरनिर्वाह करतात. पण काही सामाजिक घटक जंगलातून मिळणारे मोहे एकत्र करून कुटुंबाची पालनपोषण करतात. याच काळात होळीचे सण सुध्दा मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. शहरांकडे पलायन झालेले तरूण गावाकडे येतात. होळीच्या दिवशी गावातील मंदिराजवळ रात्रभर आगची होळी पेटवली जाते. ती संध्याकाळी पेटल्यानंतर गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या घरून एक लाकूड घेऊन त्या होळीतून आग लावून शेतीकडे जातो. त्याचा उद्देश नवीन पिके घेण्यापूर्वी शेत साफ करणे असते, त्यासाठी शेतकरी ती लाकडाची आग घेऊन शेतातील stubble burning करतो. या प्रक्रियांमुळे होणाऱ्या प्रदूषण वातावरण शोषित करणाच्या क्षमतेऐवढा असतो. पण त्याच पाश्वभूमीवर जंगलातील मोहे एकञ करणारे काही लोक जंगलाला आग लावतात. माझ्या गावात सुध्दा होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जंगल जाळल्यामुळे सगळीकडे धूळ पसरून दिल्लीच्या धुक्यासारखी प्रतिमा तयारी झाली आहे.
![]() |
| Picture credit:- Umesh bansod |
यात हिंदू धर्मातील एकोप्याने साजरे केलेल्या सणाची चूकी नाही, तर बदलत्या काळातील माणसी लालसा कारणीभूत आहे. थोडे मोहे एकत्र करण्याच्या नादात जंगलातील जैवविविधतेवर परिणाम पडताना दिसतो. यातून हेच स्पष्ट करणे आहे की हिंदू धर्म चूकीचे नाही, बौध्दिक समाजातील विचारवंत हिंदू धर्मातून सणातून होणाऱ्या परिणामांचे विवेचन करणारे चूकीचे नाही तर हिंदू धर्मातील रितीरिवाजाचे चूकीचे अन्वयार्थ लावून समाज हिताच्या विरूध्द बाजूने वागणारे अल्प घटकाची चूक दिसून येते.
पेरिस हवामान परिषद २०१५ मध्ये घडून आली होती, त्यात स्पष्ट पणे नमूद करण्यात आलेले आहे की जर २१ शतकात पृथ्वीच्या तापमानात २% से. च्या वर वाढ झाल्यास हवामान बदल (Climate change) होईल. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर प्रदूषणमुक्त ऊर्जेच्या स्त्रोतांवर वाटचाल करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांना पर्यावरण संरक्षण आधारित तंत्रज्ञान हस्तांतरण करतील आणि गरीब राष्ट्रांना पर्यावरणीय पोषक आधारित पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी वित्तीय सहायता देतील अशी ग्वाही पेरिस परिषदेतून देण्यात आली होती, परंतु त्यावर काहीही अमंलबजावणी होतांना दिसून येत नाही. त्यामुळे सगळ्या जगासमोर हवामान बदल जागतिक समस्या उभी झाली आहे. भारताने International solar Alliance आणि one sun, one grid, one world अशा कार्यक्रमावर कार्य करत आहे. परंतु स्थानिक पातळीवर वनसंपदेतेचे संरक्षण करण्यास अपयशी होतांना दिसतोय. स्थानिक पातळीवर थोड्या नफ्यासाठी जंगलात लावलेली आग जैवविविधतेला धोक्यात आणत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्सगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अगत्याचे आहे.
बौद्धिक वर्ग हिंदू सणाच्या होणाऱ्या चांगल्या फायदाची दखल न घेता अल्प घटकांकडून या सणाच्या वेळेस चूकीच्या कृती केल्या जातात आणि हिंदू धर्मावर टीकेचे प्रहार होतात, परंतु खरी परिस्थिती उलट असते. समाजात आधुनिकता, तंत्रज्ञान आणि तथ्य ( Logic) याची गरज असते, परंतु भारतीय समाजात धर्माचा प्राबल्य २१ व्या शतकात सुध्दा आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माची मांडणी समाज पोषक, आधुनिकतेशी सुसंगत करणे काळजी करज बनली आहे.
![]() |
| Photography:- Umesh Bansod |



अप्रतिम
ReplyDelete