भ्रामिक इतिहासाचा अंत
राजकीय तत्त्वज्ञानातील अग्रगण्य विचारवंत हेगेल यांनी "फेमोलाॅजी ऑफ स्पिरीट " या प्रसिद्ध ग्रंथांतून वाद आणि प्रतिवाद अभिसरणातून सुसंवाद घडून येतो, असे प्रतिपादित केले. याच पाश्वभूमीवर इतिहासाचा अंत (End of History) होईल असे भाकीत केले. या संकल्पनेला समकालीन काळातील सुप्रसिद्ध विचारवंत फ्रांसिस फुकुयामा यांनी आतरराष्ट्रीय दृष्टीकोनाचे वेगळेच आवरण दिले.
शीत युद्धादरम्यान सोव्हिएत रशिया आणि अमेरिका मध्ये वैचारिक संघर्ष आणि शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण होते. यामध्ये वाद आणि प्रतिवादात सुसंवाद घडले म्हणजे सोवियत रशियाचे १५ राष्टात विघटन झाले. या नाटकीय प्रकियेला फ्रांसिस फुकुयामाने "इतिहासाचा अंत " (१९९२)ह्या नावाने संबोधले. परंतु यावर प्रतिक्रिया म्हणून चिकित्सक मांडणी करणारे प्रवर्तक सॅम्युएल हंग्टिटन यांनी "सभ्यतांचा संघर्ष "(Clash of civilisation) ह्या ग्रंथांतून इतिहासाचा अंत यांचे पुरजोर खंडन केले. सॅम्युएल नुसार, "जागतिक राजकारण हे जागतिकीकरणामुळे सहकार्य आणि परस्पर असल्याचे भ्रामिक जाणिवा आहे" कारण की मुस्लिम मूलतत्त्ववादी सभ्यतांचा आणि पाश्चिमात्य सभ्यतांचा संघर्ष चिघळेल असे वर्तविले होते. या विचारांची प्रांसगिकता (Relevance) सद्यस्थितीत फ्रान्स विरूद्ध कट्टरपंथी मुस्लिम राष्टांची गुटबाजी दिसून येत आहे.
फ्रेंच क्रांतीपासून(१७८९) फ्रान्स मध्ये मोठ्या प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मंच आहे. त्याचप्रमाणे फ्रान्स संविधानानुसार धर्मनिरपेक्ष संकल्पनेतून धर्म आणि राजकारणात फारकत केली आहे. त्यामुळे फ्रान्स मध्ये धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. अशाच पाश्वभूमीवर चार्ली हिबडों नामक नियतकालिकेने मुस्लिम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबरांच्या आगळ्यावेगळ्या चित्रकारितेतून टीका केली होती. त्यामुळे या नियतकालिकाला मोठ्या प्रमाणात धमक्या देऊन मुख्य ऑफिस वर बॉम्बस्फोट करण्यात आला होता. अशीच परिस्थिती सद्यस्थितीत झालेली आहे, फ्रान्स मधील एका शिक्षकांनी मुहम्मद पैगंबरांचे चित्रद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे कट्टर मुस्लिम मूलतत्त्ववादी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची हत्या केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँद्वारे या हत्येचा निषेध करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गधा येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे मुस्लिम देशात मोठ्या प्रमाणात फ्रान्सच्या वस्तूचे बहिष्कार करून फ्रान्स विरोधी आंदोलन चालू आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी तेथील एका चर्चवर सुध्दा हल्ला करण्यात आला. त्यामुळे सॅम्युएल हंग्टिटन यांच्या सभ्यतेचा संघर्षाची बीजे दिसून येत आहेत.
अरब राष्ट्रांमधील बेरीजेचे राजकारण समजणे गरजेचे आहे. या राजकारणातील मध्यवर्ती केंद्रबिंदू टर्की दिसून येतो. टर्कीमधील आतंरिक राजकारणात मुस्लिम कट्टरवादी संक्रमणाचे वारे आहेत. मागील काही काळापाासूून मुस्लिम मूलतत्त्ववादी निर्णय सरकारकडून देण्यात आले. उदा. हागिया सोफियाला मस्जिदांचे रूप देणे. भारतातील कश्मीर पुनर्रचनेबद्दल टीका करणे, अझरबैजान आणि आर्मेनिया ला युध्दासाठी प्रोत्साहित करणे, ग्रीस सारखा शांतिप्रिय राष्टाला युद्धाची धमकी देणे. त्याचप्रमाणे स्वराष्ट्राची तुलना ऑटोमन साम्राज्य सोबत करून मुस्लिम राष्टाचा बलशाली राष्ट्र समजणे, अशा कारणाने फ्रान्स सरकाराने टर्कीच्या निर्णयाचे पूर्णपणे विरोध केले होते. तीच बदलांची भावना टर्की, पाकिस्तान आणि इतर अरब राष्ट्र सद्यस्थितीत फ्रान्स सोबत करताना दिसत आहे.
अशाप्रकारे फ्रांसिस फुकुयामाची मांडणीत विरोधाभास दिसून येत आहे, फुकुयामानुसार १९९० च्या काळात वैचारिक संघर्ष संपुष्टात येऊन परस्पर सहकार्याने भांडवलशाही(उदारमतवाद) प्रगती करेल असे वक्तव्य काल्पनिक वाटत आहे. पण त्यास विरोधक सभ्यतांचा संघर्ष संकल्पना मजबूत आणि प्रगल्भ स्थान घेत आहे.
लेखक:- टेमदेव बनसोड temdeobansod@gmail.com

Mast
ReplyDeleteKhup sundar
DeleteMst Visletion..👍🏻
DeleteGreat article brother👍👍
ReplyDelete