SCO च्या परिषदेसमोर भारताचा पेचप्रसंग

   सद्यस्थितीत चीन आणि अमेरिका ह्या दोन देशात तणावाचे वातावरण तयार झाले आहेत. चीन जागतिक राजकारणात अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देश आतरराष्ट्रीय मुद्रा कोष(International Monetary Fund), जागतिक व्यापार संघटना (WTO)आणि जागतिक बँक(World Bank) मधून जागतिक राजकारणात दबदबा केले आहेत, या वर्चस्वाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आशिया खंडातील चीन, रशिया आणि काही प्रमाणात भारताने ब्रिक्स(BRICS) आणि स्को(SCO) सारख्या संघटनेची स्थापना करून जागतिक राजकारणात विविधता आणि पर्यायी व्यवस्था तयार केली आहे. 
    परंतु १५ जून ला लद्दाख मधील ग्लवान खो-यात चीन आणि भारत सैनिकांच्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तेव्हापासून भारतात चीन विरोधी भावना खूप तयार झाल्या आहेत. त्यामुळे भारत चीन ला आर्थिक, सामरिक आणि आतरराष्ट्रीय सहयोग घेऊन मोर्चेबांधणी करत आहे. पण सप्टेंबर महिन्यात रशिया मध्ये शांघाई सहयोग संघटनेची(स्को) परिषद आयोजित केली आहे.त्यापूर्वी शांघाय सहयोग संघटना काय आहे ते समजून घेणे गरजेचे आहे. 

 *शांघाई सहयोग संघटना*
          पाश्चात्य राष्ट्राचा दबदबा जागतिक राजकारणात कमी करण्यासाठी शांघाय ५ म्हणून १९९६ मध्ये चीन, रशिया, कझाकस्तान, किरगिस्तान आणि ताजिकिस्तान या प्रमुख राष्टांनी स्थापना केली. यातून चीन आशिया ची महासत्ता म्हणून कार्य करतो. या संघटनेचा मुख्य उद्देश नाटो(NATO) आणि यूरोपीय महासंघ सारख्या संस्थेचा विरोधक म्हणून सहमती केली आहे. परंतु भारताने व्यापारीक आणि शेजारील राष्ट्रांसोबत सौहार्दाचे संबंध ठेवण्यासाठी सदस्यत्व घेतला. भारताचा प्रमुख उद्देश जगाचे सत्ता संतुलन बहुध्रुवीय करणे होय. २००१ मध्ये उब्जेकिस्तान यांचा सदस्य स्वीकारल्या नंतर शांघाय ५ चे रूपांतर शांघाय सहयोग संघटनेत झाले. 
       परंतु रशिया आणि भारत हे चांगले मित्र राष्ट्र असल्याने कारणाने रशियाने भारताला सदस्यत्व मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु चीन ने सुध्दा पाकिस्तान ला सदस्यत्व देण्यासाठी जोर लावले त्यामुळे अस्ताना संधीतून २०१७ ला भारत आणि पाकिस्तान ला सदस्यत्व मिळाले. 
 
*भारतासमोर पेचप्रसंग*
       १५ जून च्या चकमकीनंतर चीन आणि भारताचे संबंध शञूत्वाचे झालेले दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी RIC (Russia India China) ची परिषद झाली होती. त्यामध्ये रशियाला चीन व भारत सीमा विवाद मध्यस्थी करण्याचे मंच उपलब्ध झाले होते परंतु  आपले राष्ट्रीय हित जपत दोन्ही राष्ट्रांतील मुद्दामध्ये ढवळाढवळ केली नाही कारण की रशियाची शञूता सगळ्या पाश्चिमात्य राष्ट्रांशी असल्याने भारत आणि चीन हे दोनच राष्ट्र रशिया कडून पेट्रोलियम आणि संरक्षण हत्यारे घेऊन रशियाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत.त्याचप्रमाणे शांघाय सहयोग संघटनेचे मुख्यालय बीजिंग मध्ये असून चीन स्वताला आशियाई महासत्ता समजतो. त्यामुळे भारत पुढील मॉस्को मधील परिषदेत सहभागी होईल की नाही असा प्रश्न तयार झाला आहे. 
       एका बाजूला भारत हा अमेरिकेशी मोठ्या प्रमाणात संबंध वाढवून चीनची घेरेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे अमेरिका नाटो संघटनेचा प्रमुख स्थापनाकारी सदस्य आहे, परंतु शांघाय सहयोग संघटना मुख्य उद्देश नाटो संघटनेचा विरोध आहे. 
      दुसऱ्या बाजूला शांघाय सहयोग संघटना मध्ये प्रत्येक राष्ट्र आपले एक प्रतीक(अजूबा) म्हणून प्रस्तुत करतो. भारताने Statue Of Unity  हे प्रतीक ठेवले आहे, तर चीनने  One belt Initiative हे ठेवले पण भारत चीनच्या या परियोजनेचा विरोधक आहे कारण की भारतानुसार ह्यातील एक प्रकल्प पाकिस्तान चाइना इकोनॉमिक कॉरिडॉर आहे. या प्रकल्पामुळे भारताची सार्वभौमत्व आणि एकतेला बाधा पोहचतो. त्याचे कारण म्हणजे हा प्रकल्प भारत आणि पाकिस्तान मधील विवादीत क्षेत्र गिलगिट बालिस्तान मधून जातो. 
     त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारत चीन, रशिया आणि अमेरिकेशी संबंध समतोलीत ठेवून शांघाय सहयोग परिषद सहभाग घेईल की नाही? 
    


 लेखक 
  टेमदेव रामदास बन्सोड
  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Comments

  1. खूप चांगली आणि विस्तारपूर्वक मांडणी

    ReplyDelete
  2. Brief, detailed, comprehensive writing.

    ReplyDelete

Post a Comment