कोरोना पाश्वभूमीवर जागतिकीकरणाला धोका.
जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जगाला एकत्र जोडणारा दुवा होय. प्रत्येक राष्ट्र स्वताच्या राष्ट्रीय हिताला सावरून तंत्रज्ञान, दळणवळण, मनुष्य बळ, उत्पादित वस्तूचा सीमाबाह्य देवाण घेवाण वर प्राधान्य देणे जागतिकीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. त्यातील महत्त्वपूर्ण विकास म्हणजे जागतिक व्यापार संघटना होय.
१९९० नंतर जगात कमालीने तंत्रज्ञानाचा विकास झाला, त्यामुळे जग जवळ आले. त्याचा सर्वात जास्त फायदा पाश्चात्य राष्ट्राना झालेला दिसून येतो. जागतिकीकरणातून पाश्चात्य राष्ट्र आशिया, अफ्रीका आणि दक्षिण अमेरिका खंडात उत्पादित वस्तू विकून नफा मिळवत होते. काही पाश्चात्य राष्ट्रांनी आपले उत्पादित कारखाने विकसनशील देशांमध्ये सुरू केले, त्या कारणाने तेथील कौशल्य हस्तांतरित होऊन विकसनशिल राष्ट्र "Manufacturing Hub" म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तेथील प्रमुख उदाहरण चीन आहे.
सद्यस्थितीत जगातील २० टक्के वस्तू चा पुरवठा चीन करतो. अमेरिका पासुन भारत सारखे देश औषधाचा कच्चा माल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चीन करून आयात करतात. परंतु ११ मार्च ला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ला जागतिक महामारी म्हणून घोषित केले. कोरोना हा वूहान शहरातून नोव्हेंबर २०१९ मध्ये उत्पन्न झाला. सुरुवातीला चीन ने कोरोनावर कोणत्याही उपाययोजना न करून दुर्लक्ष केले. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने चीनची पाठराखण केली. त्यामुळे यांचे परिणाम जगाला भोगावे लागले.
*परिणाम*
१. सगळ्या जगात कोरोना चा संसर्ग पसरला.
२. जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्य प्रणाली वर प्रश्नचिन्ह तयार झाले.
३. जागतिक व्यापाराला आणि अर्थव्यवस्थेला धक्का बसला.
कोरोना च्या संसर्गावर मात करण्यासाठी चीन मध्ये टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे चीन मधील उद्योग धंदे बंद पडले. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी ची पोकळी तयार झाली. अनेक राष्ट्रात वस्तू ची किल्लत माजू लागली होती. मार्च पर्यंत सगळ्या जगात कोरोना ने आपले पाय पसारले होते, परंतु चीन सरकारी आकडेवारी नुसार कोरोनावर यश मिळवून तेथील उद्योग पुन्हा सुरळीत चालू करून मोठ्या प्रमाणात मास्क, पीपीई किट, सँनिटायझर आणि औषधे युरोप आणि आफ्रिका ला पाठवून आपली छवि चांगल्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटेन या देशांनी चीनी मालांची गुणवत्ता योग्य नसल्यामुळे परत केले, परंतु चीन ने या राष्ट्राना धमक्या देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
कोरोना च्या काळात अनेक राष्ट्र धडा घेऊन संरक्षणवादाला (राष्टीय हिताला) प्राधान्य देत आहेत. अमेरिका सारख्या देश पहिले पासुनच या चीन सारख्या राष्टांशी व्यापार युद्ध करून राष्टीय हिताला महत्त्व देत आहे. भारत सारख्या देश स्वावलंबी होण्यासाठी "लोकल फॉर वोकल" च्या माध्यमातून Made In India कार्यक्रमाला प्रोत्साहन देत आहेत. पाश्चात्य राष्टांनी कच्चा मालाच्या पुरवठा साठी विविधीकरण ( Diversification) करायला सुरूवात केली आहे पण ती अल्प प्रमाणात असून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जागतिकीकरणाला धोका निर्माण झाला आहे.
* भारत व चीन च्या समोर आह्वान*
जागतिक इतिहासात १८व्या आणि १९ व्या शतकात ब्रिटिश महासत्तेने औद्योगिक प्रकियेतून मोठ्या प्रमाणात उत्पादित वस्तू तयार करून वसाहती देशामध्ये विकून आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. थोडक्यात ते जागतिकीकरणाचे स्वरूप होते कारण की ब्रिटेन हा कच्चा मालाचा पुरवठा अमेरिका, भारत आणि अफ्रिकेतील वसाहती देशातून करून उत्पादित वस्तू त्याच देशात विकत होता, तर ते देवाण घेवाण प्रकियेचे स्वरूप होते. पण २० व्या शतकात अमेरिका आणि सोवियत रशिया Manufacturing Hub म्हणून युरोपीय देशांना पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात अनेक युद्ध शस्त्र आणि कर्ज देऊन जागतिक वर्चस्व तयार केले. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्र वसाहतवादातून मुक्त होऊन स्वतंत्र झाले. परंतु अमेरिकेने आर्थिक मजबूती म्हणजे विकासाचे निर्देशांक म्हणून जगाला नववसाहतवादाच्या माध्यमातून तंत्रज्ञान, शस्त्र पुरवठा, आर्थिक सहायता आणि गैर सरकारी संघटनेच्या आधारे जागतिक नेतृत्व केले. १९९५ मध्ये जागतिक व्यापार संघटना तयार करून आपल्या हितानुसार चालवले.
परंतु, २१व्या शतकात भारत आणि चीन सारखे राष्ट जागतिक महासत्ता होण्याच्या संक्रमित मार्गावर आहेत. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे पाश्चात्य राष्ट्र संरक्षणवादाला प्राधान्य देऊन जागतिकीकरणाच्या प्रकियेस मोडीत काढत आहेत. चीन हा एकाधिकारशाही राष्ट्र असल्याने एक पक्षीय सरकार आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरण आणि पर्यावरण मंजूरी घेण्यास वेळ खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे चीन हा लवकर च Manufacturing Hub म्हणून ओळखू लागला आहे. भारत हा लोकशाही राष्ट्र असल्याने विकास कामे संथ पद्धतीने होतात. परंतु देशाला जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. भारतातील अनेक लोक विदेशात काम करून देशाला परकीय चलनाचा आयात करतात. परंतु जागतिकीकरणाला संकुचित पणा तयार झाल्यास भारतीय लोकांना विदेशात नोकरी मिळणार नाही. भारताने "आत्मनिर्भर भारत" कार्यक्रमाला सुरुवात केली, त्यातून पुढील १५ ते २० वर्षात Manufacturing Hub झाल्यावर देशाला उत्पादित वस्तू निर्यात करण्यासाठी अडचण तयार होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २०३५ पर्यंत भारतात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असेल तेव्हा त्याना भारतात मजदूरी देणे अवघड होईल, पण जागतिकीकरणाला प्रोत्साहन दिल्यास या अतिरिक्त लोकसंख्येला इतर देशांत पाठवून राष्ट्रीय दबाव कमी करण्यास मदत होईल, म्हणजे येत्या घडीला जागतिकीकरण भारतासारख्या संक्रमित महासत्तेला आवश्यक बाब आहे.
लेखक:- टेमदेव रामदास बन्सोड
Jabardast likha bhai....... Nice line
ReplyDeleteThis is a better than previous one.... I like a most.. Very good brother😘
ReplyDeleteKhup sundar lihlat Aapn ..tuhmche prayatna asech chalu thewa....
ReplyDeleteKhup sundar lihlat aapan tuhmche prayatna aseche chalu thewa....
ReplyDeleteComprehensive, informative and we'll structured.
ReplyDelete