सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या पासून देशाला धडा शिकण्याची गरज

 

                  मी शेतात धान्य पेरणी करत असतांना थकून विश्रांती   घेण्यासाठी झाडांखाली बसलो, आणि मोबाईल मध्ये WhatsApp
चे स्टेट्स बघून आश्चर्य चकित झालो, जणू काही जवळपास मोठ्या विस्फोट झाला असावा. धक्कादायक बातमी यामुळे वाटली कारण, की एक टीव्ही सिल्यल पासून तर धोनी असा मनाला भिडणारा चित्रपट ते छिछोरे सारख्या चित्रपटातून आत्महत्या न करणाचा संदेश देणारा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी गळाला फास लावून आत्महत्या केली. एक मनाला न आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त ३४ व्या वर्षी हार मानली. 
      सद्यस्थितीत जगाला एका बाजूने कोरोनाच्या संसर्गाने जखडून ठेवले आहे, तर दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन मुळे अनेक लोक बेरोजगार होत आहेत. ही सगळ्यात चिंतेची बाब आहे. कारण भारतासारख्या देशात सीएमआयई नुसार मे महिन्यात २७ टक्के बेरोजगारी दर आहे, असे घोषित केले. भारताची लोकसंख्या १३७ करोड च्या जवळपास आहे. भारतात कौशल्यवान कामगाराची कमी आहे वरून तंत्रज्ञानाचा वाढता वापर भारतात हे बेरोजगारीचे दर पुन्हा वाढू शकते. आता वाचकांच्या मनात प्रश्न असेल  की बेरोजगारी दर आणि सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या चे काय संबंध असेल? 
      तुमच्या मनात येणारा प्रश्न बरोबर आहे, भारत हा युवा देश म्हणून जगात ओळखला जातो. वयाच्या ३५ वर्षाखालील लोकसंख्येचा ६५ टक्के भाग आहे. म्हणजे भारताला महासत्ता बनविण्यासाठी या मनुष्य बळाची खूप मोठी मदत लागेल. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील मानव संसाधन किती गुणवत्तेचा आहे, त्यावरून त्या देशाचा विकास अवलंबून असते. सुशांत सिंग राजपूत अभिनेञे हे प्रसिद्ध आणि आर्थिक संपन्न होते, परंतु तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली. हीच आत्महत्या ची धार भारतात २०३० नंतर लागण्याची शक्यता आहे, कारण भारताची युवा देशाची ओळख २०४० मध्ये संपणार आहे. पण भारतातील कमजोर आणि पारंपरिक शिक्षण पध्दती मुळे देशात कौशल्यवान मनुष्य संसाधन तयार होत नाही. जगाला मनुष्य संसाधनाची गरज असेल, पण भारतातील शिक्षण व्यवस्थेतून फक्त डीग्री घेऊन विद्यार्थी बाहेर पडतील. नोकरी असल्याने देशात बेरोजगारी चा दर वाढेल, नोकरीसाठी प्रतिस्पर्धा वाढेल. त्यामुळे युवा मध्ये तणावातून आत्महत्या करण्याचे दर वाढू शकते. 
     अस म्हंटल जाईल, की जो राष्ट्र मनुष्य संसाधनाचा वापर करण्यात अपयशी होतो. तो देश महासत्ता कधीच बनू शकत नाही. सुशांत सिंग राजपूत हे आर्थिक संपन्न होते, पण तणावामुळे आत्महत्या केली. हीच परिस्थिती भविष्यात भारतात झाली नाही पाहिजे, त्यासाठी भारताने काय करावे त्यातून भारत मनुष्य बळाचा योग्य फायदा उचलून महासत्ता बनेल. 
 १ . देशातील पारंपरिक शिक्षण पद्धतीला संपुष्टात आणून संशोधन आणि कौशल्य प्रोत्साहित शिक्षण पध्दती लागू करणे. 
२ . देशातील लोकसंख्येचा मोठ्या प्रमाणात भाग २०५५ नंतर ६० वर्षाच्या वर असेल आणि कार्यकारी लोकसंख्या कमी असेल, त्या दृष्टीकोनातून आरोग्य सुविधा विकसित करणे. 
३. २०४० नंतर जगाला( इटली, रशिया आदी) भारतीय युवा वर्गाची गरज पडेल, तेव्हा त्याच्याकडे कौशल्य असणे गरजेचे पडेल, तो विकसित करणे. त्यातून भारतातील लोकसंख्येचा दबाव कमी होईल. 
४. भविष्यात ही युवा पिढी आपल्या आरोग्यसेवा साठी राज्यसंस्थेवर अवलंबून न राहण्याची आतापासूनच त्या बचत करण्यासाठी सरकारने योजना काढणे. 
५. ATAL INNOVATION MISSION सारख्या उपक्रमांना वाव द्यावी. 
६. देशातील सरकारी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा घालून वित्तीय सहायता देऊन त्यांना स्वायत्तता देणे. प्रमुख बाब म्हणजे राजकीय हस्तक्षेपासून मुक्त ठेवणे.
७. महत्त्वाचे गोष्ट नमूद करायला विसरला ते म्हणजे जगाचा पोशिंदा दर वर्षी भारतात आत्महत्या करतो, तर त्याची कर्ज माफी न करता त्याला स्वयंपूर्ण बनवणे गरजेचे आहेत. त्याला तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहित करणे आणि कमी जागेवर उत्पादकता वाढविण्यासाठी मंच तयार करून देणे. 
८. आत्महत्या किती चूकीची आहे, याला शालेय जीवनापासून मुलांच्या मनावर बिंबवणे. 
    ही घटना शोकांतिकाची आहे की एक आगळ्यावेगळ्या रूपात येणारे अभिनेता सोडून गेले, पण त्याच्या या वाईट करणी वरून देशाला धडा शिकण्याची गरज आहे. 



लेखक:- टेमदेव रामदास बन्सोड

Comments

  1. Ayushya khup lhan ah mnun hv te kra . Mhtvach mnje swtala odkha Ani swatasathi ved kadha . Kitihi motha problem ala tri eka gostivr maza vishvas ah ki problem ah tr solution ha ashnarch . Alelya kivha yenarya samsella tond denyachi baka prasang nibhaun ghenyachi vrutti banvaychi vay mnje appli tarunai , thode jri apekshepramane vegde zale mnun tithech ayushaach shevat nh tr tithun khari suruvat kra ,karn ayush phar lhan ah ,Rdtos KY vedya ldhnyat Shan ah....

    ReplyDelete
  2. खरच भाऊ मी तुझं article वाचला , वाचत असताना असे वाटत होते की डोक जाग्यावर होत पण विचाराला मात्र एक प्रोफेशनल लेखक लिहिलंय अस वाटे, पुन्हा असे नावीन्य आर्टिकल देशाच्या कल्याणासाठी आम्हा युवा पिढी प्रोत्साहीत करेल ,खरच भाऊ आज मला तुझ्याबद्दल खूप मनापासून आधर आहे
    🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. 👌👌👌👌👍👍👍👍👍

    ReplyDelete
  4. Khup chhan maja jivlag mitra.... Mala sudhha yek navin angle midala jivnakde ani deshya kade baghnyacha... New article sathi wait karnar mi... Very good

    ReplyDelete
  5. Khup mst bhava.. great words from tomorrows policy maker..

    ReplyDelete
  6. छान आहे मित्रा तुझा आर्टिकल

    ReplyDelete

Post a Comment