जगासमोर दुसऱ्या शीत युध्दाचे आसार..

        दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाचा आरंभ होऊन जग दोन गटात विभागला गेला. एकीकडे अमेरिका तर दुसरीकडे सोविएत रशिया. हा युध्द प्रत्यक्ष नसून वैचारिक संघर्ष, शस्ञाञ स्पर्धा होती. एक पध्दतीची महासत्ता होण्याची होळ होती. अमेरिका भांडवलशाही पसरून नफा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता, तर सोविएत रशिया साम्यवादाचे पाय जगात कसे रोवायचे यासाठी अमेरिका विरुद्ध गुटबाजी तयार करत होता. अशाप्रकारे जगात सत्ता संतुलन तयार झाले. या कालावधीला व्दिध्रुवीय जग (Bipolar world) म्हणून संबोधले जाते.१९४५ मध्ये चालू झालेला हा युध्द १९९० मध्ये सोव्हियेत रशिया च्या विघटनानंतर संपुष्टात आला. सोव्हियेत रशिया चे १५ देशात विभाजन झाले. त्यानंतर जग एकध्रुवीय होऊन अमेरिकेचे वर्चस्व वाढले. अमेरिकेने आपली शक्ती मोठ्या प्रमाणात खिंचण्याचा प्रयत्न केला. त्याच स्पष्ट उदाहरण २००३ मध्ये तेलाचा राजकारण करण्यासाठी व सद्दाम हुसैनला सत्तेवरून काढण्यासाठी इराक वर अवैध युद्ध केला. त्यावेळी ब्रिटेन, फ्रान्स आणि स्पेन सारख्या देशाची कट्टर विरोध दर्शवला होता. पुन्हा एकीकडे भारत आणि चीन सारखे देश आर्थिक शक्ती म्हणून उभरून आले. त्यामुळे अनेक राज्यशास्त्रज्ञांनी जग बहुध्रुवीय झाले म्हणून वर्तविले. 
           परंतु, ज्या राष्ट्राकडे आर्थिक शक्ती असते, त्याचा दबदबा आंतरराष्ट्रीय राजकारणात जास्तच दिसून येतो. गत वर्षात चीन हा अमेरिकाला टक्कर देणारी आर्थिक शक्ती म्हणून तयार झाला आहे, तसेच अनेक अमेरिकेच्या मुद्दयाना दुर्लक्षित करून त्याविरूद्ध भूमिका घेतांना दिसतो. त्याचा उदाहरण अमेरिकेने आताच इराण वर आर्थिक निर्बंध लादून जगाला इराण कडून कच्चा तेल आयात करण्यासाठी आह्वान केले, त्यामध्ये भारताने सुध्दा तेल आयाताची कमी केले, पण चीन ने मोठ्या प्रमाणात तेल आयात करत आहे. 
           सद्यस्थितीत कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून हात बाहेर काढले, तर चीन ने आर्थिक पुरवठा करून जागतिक आरोग्य संघटनेला चीनक्रेंदीत केलेले दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जग एकीकडे कोरोनाला मात करण्यासाठी गुंतला असताना चीन दक्षिण चीन महासागरात आपला दबदबा वाढवत आहे, पण इतकी शक्ती चीन ने कशी वाढवली ते समजणे गरजेचे आहे. 
       पाश्चात्य राष्ट्राना वगळून तीन वेगवेगळ्या महाखंडातील उभरती अर्थव्यवस्था चीन, भारत, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि ब्राझील या राष्ट्रानी २००९ मध्ये ब्रिक्स ची स्थापना केली. २०१४ मध्ये वेगवेगळ्या राष्ट्राना जागतिक बँकेला वगळता कर्ज मिळण्यासाठी दुसरा पर्याय म्हणून New Development Bank  ची स्थापना करण्यात आली. १९९६ पासून पूर्व कडील राष्ट्रांनी पाश्चात्य दबदबाला कमी करण्यासाठी  Shanghai cooperation organization ची स्थापना करण्यात आली. २०१५ मध्ये भारत आणि पाकिस्तानाला पूर्ण सदस्यत्व मिळाले. 
         अमेरिकेने मार्शल प्लॉन, Structural Adjustment Programme मधून जागतिक वर्चस्व तयार केला होता, त्याचप्रमाणे चीन ने तयार केलेला  One Belt One Road initiative तंतोतंत जुळणारा कार्यक्रम म्हटला जातो, या कार्यक्रमातून चीन अनेक राष्ट्राना कर्जाच्या जाळ्यात अडकविण्यात यशस्वी झाला आहे, उदा, पाकिस्तान आणि श्रीलंका होय. अनेक विचारवंतांनी असे स्पष्ट केले आहे की, प्राचीन काळात चीन रेशम मार्गातून जगाला आपल्या वस्तू निर्यात करत होता, ते पुन्हा प्राप्त करून जागतिक दबदबा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
        शीत युद्धादरम्यान तंत्रज्ञान हा शक्ती दाखवणारा महत्त्वाचा साधन होता. त्या बाबतीत सुध्दा आता चीन ने ५-जी तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात भांडवल खर्च करत आहे. त्याचप्रमाणे चीन ने  Quantum तंत्रज्ञान वर मोठा संशोधन आराखडा तयार केला आहे. चीनने  Quantum तंत्रज्ञानातून उपग्रह सोडला आहे, पण अमेरिका त्यावर अजून ही शोधच करत आहे. ब्रिटेन सारख्या राष्ट्रांने चीन च्या हुवेई ५ जी तंत्रज्ञानावर पर्यायी मार्ग म्हणून  D-10 ( दहा लोकशाही राष्ट्र भारतासहित)बनविण्याची घोषणा केली आहे. 
      त्याचप्रमाणे चीन अफ्रीका, दक्षिण आशिया देशात अब्जावधी डॉलर ची गुंतवणूक करत आहे. त्यामुळे पाकिस्तान, इराण सारखे राष्ट्र चीनची पाठराखण करताना दिसतात. अशाप्रकारे चीनची वाढती शक्ती दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. हे स्पष्ट करून देतात की जगात दुसऱ्या शीत युद्धाचे आसार दिसत आहेत. 
       अमेरिकाला सुध्दा यांचे आकलन झालेले आहे, त्यामुळे अमेरिका चीनविरोधी जागतिक पातळीवर समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका चीनची इंडो-पँसैफिक महासागरात घेरेबंदी करत आहे. अमेरिका ने Quad  ची स्थापना केली आहे, त्यातून जापान, भारत, आस्ट्रेलिया आणि अमेरिका सैन्य अभ्यास करून चीनला शह देण्यासाठी प्रयत्न करतात. अमेरिका चीनच्या कमजोर पंखावर नेहमी इजा पोहचविण्याची वेळ बघत असतो. 
 १. अमेरिका चीन मध्ये होत असलेल्या मुस्लिम धर्मावर होत               असलेल्या अत्याचार विरूद्ध कायदा पारित करून मानवाधिकार     उल्लंघनाचे आरोप करत आहे.                                                  २. अमेरिका ने तिबेट ला सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी     एक विधेयक मांडला आहे. 
 ३. अमेरिका तैवान आणि हॉंगकॉंग क्षेञाला स्वायत्तता मिळवून         देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 
       त्याचप्रमाणे अमेरिका पुढील काळात होणाऱ्या जी-७ समूहात भारत, दक्षिण कोरिया, आस्ट्रेलिया आणि रशिया ला सदस्यत्व मिळवून देणाचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चीन व अमेरिका मध्ये कमालीची तणावाचे वातावरण तयार झाले आहेत. या व्दितीय शीत युद्धात बहुध्रुवीय जग असल्याने अस्पष्टता दिसून येत आहे. कोविंद नंतरच्या काळात जगाचे नवीन स्वरूप असल्याने आसार दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी चीन आपल्या संरक्षण बजट मध्ये ६ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली, तर अमेरिका सुध्दा २०२१ नंतर परमाणु शक्ती वाढवण्यावर भर देऊ शकतो, कारण स्टॉर्ट संधी २०२१ मध्ये संपणार आहे.    


लेखक:- टेमदेव रामदास बन्सोड
           सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ विद्यार्थी

Comments

  1. Apratim lekh maja mitra... Asech chhan chhan lekh lihat raha 😘

    ReplyDelete
  2. Bhari आणि मंथानिय विचार मांडलेले आहेस.तुझी प्रगती अशीच होत राहो

    ReplyDelete
  3. Very knowledgeable thank you bro keep it up 👍

    ReplyDelete

Post a Comment