जागतिक राजकारणात अमेरिकेचे घटते महत्त्व
८ नोव्हेंबर २०१६ मध्ये जागतिक राजकारणात दोन विलक्षणीय घटना घडल्या, एका टोकाला जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र भारतात ५०० आणि १००० ची नोटबंदी झाली, तर दुसऱ्या टोकाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी धुरा सांभाळला. तेव्हापासून जागतिक नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर वाटाघाटी करणारा अमेरिका राष्ट्राला उतरती कळा लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आपल्या ताकदीच्या जीवावर सर्व जगाकर राज्य करतो. आरोग्य, दळणवळण, संरक्षण, संशोधन, तंत्रज्ञान आणि शिक्षण या सगळ्या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. अमेरिकेला जागतिक नेतृत्व करत असताना त्याला मोठ्या प्रमाणात अर्थहानी आणि जीवितहानींना समोर जावे लागले आहे.
परंतु, २०१६ नंतर अमेरिकेचे जागतिक स्वरूप बदलेले दिसते त्यांचे प्रमुख कारण म्हणजे २०१६ च्या निवडणूकीच्या राजकारणातून संरक्षणवादाच्या मुद्द्याला डोनाल्ड ट्रम्प द्वारे प्राधान्य देण्यात येणे. याच पाश्वभूमी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प हे व्यावसायिक(Business man) असल्यामुळे यांनी राष्ट्राला कशाप्रकारे लाभ कमावता येईल, याला मुख्य प्रयोजन दिले. ओबामा द्वारे इराण चा अण्वस्त्र कार्यक्रमावर निर्बंध लावण्यासाठी Joint comprehensive plan of Action ( Iran Nuclear Deal) जानेवारी २०१६ मध्ये लागू केला होता, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी चूकीचे सर्वक्षण करून तो करार रद्द करून इराण वर आर्थिक निर्बंध लादले. त्याकारणाने अमेरिका विरूद्ध मोर्चेबांधणी साठी इराण, रशिया आणि चीन यांचे समीकरण तयार झाले. त्याच निवडणुकीमधून ट्रम्प यांनी अफगाणिस्तान मधून सैनिकांची माघार घेतील असे आश्वासन दिले होते, परंतु मागील २० वर्षापासून अमेरिका सैन्य शक्तीला तालीबान व इतर दहशतवादी संघटनांना संपुष्टात आणण्यात अपयश आले आहेत.
वाढते औद्योगिकीकरणामुळे २० व्या आणि २१ शतकात तापमान वाढ आणि ओझोन अपक्षय सारख्या समस्या तीव्र बनल्या आहेत. यांचे निराकरण करण्यासाठी जागतिक पातळीवर वसुंधरा परिषद आणि पेरिस परिषद महत्त्वाचे म्हटल्या जातात. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी paris agreement मधून हात मागे काढले, ट्रम्प या नैसर्गिक बदलांना महत्त्व देत नाही, त्याच्या नुसार ते आपोआप घडून येतात, असे वक्तव्य केले. अशा कारणाने अमेरिकेचे वर्चस्व आणि जागतिक नेतृत्व कमी होतांना दिसते.
याच पाश्वभूमीवर जागतिक राजकारणात चीन ही उभरती आर्थिक शक्ती आहे. अमेरिका आणि चीनचे प्रचंड प्रमाणात व्यापार संबंध आहेत आणि अनेक उत्पादित वस्तू चीनकडून अमेरिकेला निर्यात केले जातात पण अमेरिकेला व्यापार तोटा होतो. याच कारणांने चीन व अमेरिकेत १ वर्षापासून व्यापार युद्ध चालू आहे. त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाले. अमेरिका पहिल्या व दुसऱ्या महायुद्धादरम्यान युरोपला मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन मदत केली होती. शीत युध्दात सुध्दा नाटो सारखी सैनिकी संघटना तयार करून जागतिक वर्चस्व प्रस्थापित केला होता. अमेरिका ने मार्शल प्लॉन सारख्या काही महत्त्वाच्या आर्थिक मदतीच्या योजना राबविल्या होत्या. याच्या अंतर्गत युरोपला मोठ्या प्रमाणात मदत केली गेली. पण आजच्या परिप्रेक्ष्यातून हाच यूरोप अमेरिकेपासून दुरावताना दिसतो. हाच प्रमुख कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर युरोप आणि अमेरिकेचे खटके उडायला सुरूवात झाली.
आजघडीला वूहान शहरातून उत्पन्न झालेला कोरोना विषाणू १९ जागतिक समस्या बनली आहे. त्याची झळ जगात सर्वात जास्त अमेरिकेला बसली आहे. आतापर्यंत दोन महिन्यात १७ लाखाहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, त्याचे प्रमुख कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी योग्य क्षणाला टाळेबंदी घोषित केली नाही. एकीकडे युरोपातील विषाणू चे केन्द्र बिदू झालेले इटली, स्पेन, नेदरलँड्स अशा राष्ट्रांची विमानसेवा बंद केली होती, त्यातून स्पष्ट होते की अमेरिका जागतिक राजकारणात सकुंचित वृत्तीचा होत आहे. माञ, चीन हा एकाधिकारशाही असलेला राष्ट्रात विषाणूवर मात करून पुन्हा उदयोगधंदे सुरळीत पार पडत आहेत. चीन हा राष्ट्र अमेरिकेच्या संरक्षणवादाच्या आणि मास्क डिप्लोमेंसीचा( राजनय) वापर करून मोठ्याप्रमाणात जागतिक नेतृत्व करून इटली, स्पेन, आफ्रिकन देशांना मास्क, औषधे, सँनिटायझर यांचा पुरवठा करत आहे. चीनने आपल्या प्रपोगोंडा मशीनचा वापर करून जगाला हे दाखवायला सुरूवात केली की आमच्या वर एवढे मोठे संकट असुनही आम्ही सर्व जगाला सगळ्या गोष्टी पुरवतो आहोत. या प्रपोगोंडा गेममध्ये चीनला यश मिळाले आहेत, दुसरीकडे जागतिक महासत्ता असणारा अमेरिका माञ स्वतः च्या गोष्टी मध्येच गुंतला आहे, माञ आजघडीला जगाच्या मदतीसाठी चीन स्वताला सावरून आतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्व वाढवत आहे. आज संपूर्ण अमेरिकत भीतीचे वातावरण आहे. ह्या वातावरणामुळे आर्थिक असुरक्षितता हे महत्त्वाचे कारण आहे. कदाचित अमेरिकेला या परिस्थितीची कल्पना असावी.
शीतयुधदानंतर अमेरिकेने आतरराष्ट्रीय संघटना आणि बहुराष्ट्रीय संस्था ना वित्तीय मदत करून तेथील ध्येयधोरणे आपल्या हितसंबंधाना अनुसरून आखत होता.आता तोच प्रकार चीन करून जगभरात त्याचे अब्जावधी प्रकल्प सुरू केले आहेत. चीनने आंतरराष्ट्रीय संघटनाना मोठी आर्थिक मदत करायला सुरूवात केली आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला आर्थिक मदत थांबवून आपले सदस्य रद्द केले. आजघडीला चीनने जागतिक आरोग्य संघटनेला उचलून धरले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धुरीणत्वाची जी पोकळी तयार झाली आहे. कोरोना नंतर नवीन विश्वरचना तयार होऊन चीनकेंद्रीत जग कदाचित पाहायला मिळू शकते
लेखक:- टेमदेव बन्सोड
Mast bhai...Thodya grammatical problem ahe...Khup chan lihilas
ReplyDeleteनक्कीच पुढच्या वेळेला मी त्याची दक्षता घेणार. .. धन्यवाद
DeleteGreat thinking dada....You have written a good article
ReplyDeleteTy
Deleteमस्त लिहिलंय👌👌
ReplyDeleteधन्यवाद
Delete👍👍👍
ReplyDeleteधन्यवाद दादा
Deleteआंतरराष्ट्रीय घडामोडीचे योग्य विश्लेषण केलेल आहे. आपला लेख वाचून खूप काही नवीन गोष्टीचे ग्यान मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी वर खूप बारीक लक्ष ठेवून आहात.
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteNice..
ReplyDeleteTy
DeleteNice
ReplyDelete👌👌👍nce blog
ReplyDeleteAtishay sunder vishleshan kel aapan...
ReplyDeletePura jabriii
ReplyDeleteMst bro
ReplyDelete👍👍👍
ReplyDeleteGood attempt brother... You definitely succeed to improve your articles in upcoming days..... You're a fab bro 😘
ReplyDeleteNice one 🤗
ReplyDeleteKhupach chhan bhau 👌👌
ReplyDeleteKya baat, kya baat, kya baat.........Khup chan ahe ......Tu ankhi changle likhan kru shaktos.......👍
ReplyDeleteNice.... Temdeo
ReplyDeleteBansod जी नोटा बंदी च्या तोट्या बद्दल तुमि काहीच नाही बोलतात
ReplyDeleteTumch brobr ahe pn topic nusar te nahi n..
DeleteNice cohesion of ideas sir
ReplyDelete